मुंबई : औषध विक्री व उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे ऑनलाइन ॲप्लिकेशन पोर्टल आठवडाभरापासून बंद आहे. त्यामुळे दररोज पोर्टलवर करण्यात येणाऱ्या १०० ते १५० तक्रारी प्रलंबित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औषध विक्री परवाना काढणे, त्याचे नूतनीकरण करणे, नवीन फार्मासिस्टच्या नावाचा समावेश करणे, जुन्या फार्मासिस्टचे नाव काढणे, नवीन उत्पादनाची नोंद करणे अशा अनेक बाबींना मंजुरी मिळविण्यासाठी औषध विक्रेते व उत्पादकांना अडचणी येत आहेत. अनेक बाबींसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या ‘एक्सएलएन महाराष्ट्र’ या ऑनलाइन ॲप्लिकेशन पोर्टलवरून अर्ज करावा लागतो. संपूर्ण राज्यातून पोर्टलवर दररोज जवळपास १०० ते १५० अर्ज येतात.

हेही वाचा >>>प्रकल्प नोंदण सुलभ व्हावी यासाठी महारेराचे आता विशेष खुले सत्र; नागपूर आणि पुण्यात प्रत्येक महिन्यात सत्र घेण्याचा महारेराचा निर्णय

राज्यामध्ये सुमारे ८० हजार औषध विक्रेते असून, १० हजार वितरक आणि एक हजार उत्पादक कंपन्या आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सुमारे १५ हजार औषध विक्रेते, तीन हजार घाऊक विक्रेते आणि मुंबई प्रदेश महानगर परिसरात जवळपास ५० औषध उत्पादक कंपन्या आहेत. पोर्टल बंद असल्यामुळे या सर्वांनाच याचा फटका बसत असल्याची माहिती ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

अडचणी कोणत्या?

एफडीएच्या संकेतस्थळावरून औषध परवाना काढण्याच्या पोर्टलवरून परवाना नूतनीकरण व अन्य अर्ज करता येत आहेत. मात्र अर्ज केल्यानंतर शुल्क भरता येत नसल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. ज्या विक्रेते, उत्पादक व वितरकांनी अर्जासह शुल्क भरले आहे, त्यांची चलान पावती मंजूर होत नाही, ज्यांची चलान पावती मंजूर झाली आहे, त्या अर्जावर प्रक्रिया होत नाही.

अन्न व औषध प्रशासनाचे संकेतस्थळ सुरू आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करताना भरावे लागणारे शुल्क भरता येत नाही. हा प्रश्न सोमवारपर्यंत निकाली लावण्यात येईल. तसेच त्यावर तोडगा न निघाल्यास शुल्क भरण्यासाठी अन्य स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. – राजेश नार्वेकर, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन