मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाच्या धारांमुळे नागरिकांना त्वचेचे रोग होतात. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र त्याचबरोबर नागरिकांना त्वचारोगांचाही सामना करावा लागत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा… मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील सर्व झोपु प्रकल्पांवरील स्थगिती ‘ईडी’कडून मागे!

करोनामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांना त्वचेसंदर्भातील फारसे आजार झाले नव्हते. मात्र यावेळी वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून घामोळे, उबाळू, बुरशीजन्य रोग, खाज, पुरळ यांसारखे त्वचेसंदर्भातील रोग नागरिकांना होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरामध्ये या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

हेही वाचा… “आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, कारण…”, संजय राऊत यांचं मोठं विधान

प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. हा घाम शरीरावर साचून राहिल्याने त्वचेवरील घाणेंद्रिये बंद होतात. घाणेंद्रिये वेळीच पाण्याने स्वच्छ न केल्यास त्वचेचे विकार होण्यास सुरुवात होते. मुंबईमधील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत महिनाभरापासून वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बुरशीजन्य रोग, घामोळे आणि उबाळू आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती जे.जे.रुग्णालयातील त्वचाविकार विभागातील डॉक्टरांनी दिली.

काय काळजी घ्याल

  • घाम सतत येत असल्याने दिवसांतून दोन वेळा साध्या पाण्याने अंघोळ करा.
  • अंघोळ शक्य नसेल तर ओल्या कपड्याने शरीर चांगले पुसून काढा.
  • नियमित डस्टिंग पावडरचा वापर करावा.
  • सतत घाम येणाऱ्या जागेवर डस्टिंग पावडर लावावी.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of skin diseases due to increasing heat 30 percent increase in patients in mumbai mumbai print news dvr
Show comments