इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे कृत्य माझ्यासाठी गर्वाची बाब असल्याची निर्लज्ज कबुली दिली. यासिन भटकळ सध्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात असून, त्याच्यावर सध्या मोक्का कायद्यातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या चौकशीदरम्यान, मी जे काही केले, त्याचा मला अभिमान आहे. केलेल्या कृत्याचा मला जरासुद्धा पश्चात्ताप वाटत नाही. हे बॉम्बस्फोट घडवून मी कोणताही गुन्हा केला आहे असे मला वाटत नाही, असेही भटकळने उद्दामपणे म्हटले आहे.१३ जुलै २०११ रोजी मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भटकळला अटक करण्यात आली होती.

Story img Loader