आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष आणि आरोग्य समिती सदस्य डॉ. अजंता यादव यांना डेंग्यूची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कांदिवली पूर्व येथील दामू पाडा परिसरातील (प्रभाग क्रमांक २५) नगरसेविका डॉ. अजंता यादव यांना डेंग्यू झाला असून सोमवारी झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीसाठी त्या पालिकेच्या आर-दक्षिण विभाग कार्यालयात आल्या होत्या. १५ मिनिटांतच बैठक आटोपून त्या निघून गेल्या.

Story img Loader