मुंबई : राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत. नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्ती, गेली दोन वर्षे होत असलेला अति पाऊस आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत द्राक्षाला दर नसल्यामुळे गत चार – पाच वर्षांत पन्नास हजार एकरने द्राक्ष क्षेत्र कमी झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या विज्ञान समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत लांडगे म्हणाले, नोटबंदीनंतर द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही.  नोटबंदीनंतर कोरोना टाळेबंदीचा दुसरा फटका बसला. त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत राहिला. गेल्या दोन वर्षांत अति पाऊस झाला आहे. वर्षभर सतत पाऊस होत राहिल्यामुळे यंदा द्राक्षाला अपेक्षित प्रमाणात घड लागले नाहीत. अति पावसामुळे नुकसान वाढले आहे. एकीकडे उत्पादन खर्चात वेगाने वाढ होत आहे. बिहार, उत्तर प्रदेशमधून मजूर आणावे लागत आहेत. औषधे, रासायनिक खतांचे दरही वाढले आहेत. वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागांची काढणी करून फुलशेती, भाजीपाला आणि ऊस शेतीकडे वळत आहेत.

हेही वाचा >>>दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी

दर्जेदार द्राक्ष, बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव तालुक्यात दहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील द्राक्षबागा काढून टाकण्यात आल्या आहेत. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, धुळे जिल्ह्यांत द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. या सर्वच जिल्ह्यांत द्राक्षबागा काढून टाकल्या जात आहेत. निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्येही द्राक्ष क्षेत्रात वेगाने घट होत आहे. थॉमसन सिडलेस पासून तयार करण्यात आलेल्या सुधारीत वाणांची म्हणजे सोनाक्का, माणिकचमन, सुपर सोनाक्का, अनुष्का सारख्या जातींच्या वाणाला घड लागण्याची क्षमता कमी झाली आहे. नाशिक परिसरातून हा जातीच्या द्राक्षबागांचे क्षेत्र वेगाने कमी होऊन आयात केलेल्या आणि पेंटेट असलेल्या वाणाची लागवड वाढली आहे. नाशिकच्या तुलनेत सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून  निर्यात अत्यंत कमी होते. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात दर मिळत नाही, त्यामुळे द्राक्षबागांचे क्षेत्र घटत आहे. गेल्या पाच वर्षांत ५० ते ६० हजार एकरने द्राक्ष क्षेत्र घटले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.

सरकार- संशोधन संस्थांत ताळमेळ नाही

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि महाराष्ट्र राज्याचा कृषी विभागात अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे द्राक्ष लागवडीखालील नेमक्या क्षेत्राची माहितीही उपलब्ध नाही. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते. पण, त्याचा अतिरेकी वापर सुरू आहे. अतिरेकी वापरामुळे द्राक्ष मण्यांची लांबी वाढत असली तरीही चवीवर परिणाम होत आहे. द्राक्ष वेलीला घड लागण्याची क्षमताही हळूहळू कमी होत आहे. संशोधन संस्था आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुरेसा आणि योग्य संवाद – समन्वय नसल्यामुळेही द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. तुटलेल्या द्राक्षबागांचे क्षेत्र ६० हजार एकरांहून जास्तही असू शकते, अशी माहिती चंद्रकांत लांडगे यांनी दिली.