भिवंडी तालुक्यातील काटई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात सोमवारी रात्री तुफान हाणामारी होऊन त्यात दहा कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिकडेच काटई ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावरून ही हाणामारी झाली असून परस्परांविरूद्ध करण्यात आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader