केम्प्स कॉर्नरमधील गोपाळराव देशमुख मार्गावरील शालिमार हॉटेलच्या पाठीमागील मॉन्ट ब्लँक इमारतीचा १२ वा मजला शुक्रवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी पडला. तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत चित्रपट निर्माते दिनेश गांधी, पत्नी देवयानी यांच्यासह सात जण मृत्युमुखी पडले. तर अग्निशमन दलातील दोन अधिकारी व चार अग्निशामक जवान आगीत होरपळले असून त्यांना ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीमधील एक महिला रहिवाशी जखमी झाली असून ती ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे.
मॉन्ट ब्लँक इमारतीमधील १२ व्या मजल्यावरील एका सदनिकेमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. या सदनिकेत अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. शेजारची सदनिकाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रहिवाशांच्या वचावासाठी सरसावलेले दोन अग्निशमन केंद्र अधिकारी आणि चार अग्निशामक होरपळले. तर आगीवर पाण्याचा फवार करताना एक अग्निशामक जखमी झाला.
शुक्रवारी मध्यरात्री १.११ च्या सुमारास ही आग शमविण्यात जवानांना यश आले.
मृतांची नावे
दिनेश गांधी, देवयानी गांधी, भुरालाल मुनेरिया, चित्तरंजन दास, सुमिश्रा सेंगवान, लिफ्ट चालक चिंटू, अजय सिंह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा