मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात एका चित्रपट निर्मात्याने झाडावर चढून अनोखं आंदोलन केलं. तसेच आत्महत्येची धमकी दिली. अॅनिमल वेलफेअर बोर्डाने एनओसीच्या नावावर पैसे घेऊ नये, अशी मागणी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे यांनी केली आहे. अॅनिमल वेलफेअर बोर्ड एनओसीच्या नावावर ३० हजार रुपये घेत आहे, ते बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या वसुलींच्या विरोधात हे आंदोलन करत असल्याचं मोहरे यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी आणि अग्निशामक विभागाच्या जवानांनी त्यांना खाली उतरवलं आहे.

प्रविणकुमार मोहरे यांनी सांगितलं की, “चित्रपटामध्ये काही प्राण्यांचे चित्र दाखवले जातात. त्यासाठी अॅनिमल वेलफेअर बोर्ड एनओसीच्या नावावर ३० हजार रुपये घेतं. त्यामुळे हे पैसे घेऊ नयेत. हा एक प्रकारचा भ्रष्ट्राचार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत आहेत. मी एक मराठी चित्रपट बनवला आहे. मात्र, तो चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत आहेत. याचं कारण असं आहे चित्रपट सेन्सार बोर्डाला लावलेले नियम आणि अटी. चित्रपटात समजा एखादी कोंबडी दाखवली तरी त्या एका सीनसाठी ३० हजार रुपये भरा आणि त्यानंतर हा सीन पास करा, असा प्रकार सुरु आहे”, असं त्यांनी म्हटलं.

Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन

हेही वाचा : Worli Hit And Run Case : तीन दिवस फरार असलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी कसं पकडलं? वाचा अटकेचा घटनाक्रम!

“चित्रपटात एक बैलगाडी दाखवली तर आधी ३० हजार भरा आणि त्यानंतर सीन पास करा, असा प्रकार सुरु आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना ब्लॅकमेल केलं जात आहे. ३० हजार रुपये घेऊन अॅनिमल वेलफेअर बोर्ड कोणता नियम पाळतं? जर आम्ही चित्रपटात संस्कृती दाखवली तरीही ते प्राण्यांवरील अन्याय होतो का? मग आम्ही चित्रपट कसे बनवायचे?”, असा संतप्त सवाल प्रविणकुमार मोहरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे यांनी केलेल्या या आंदोलनामुळे मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात खळबळ उडाली होती. या ठिकाणी काहीवेळ हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यानंतर अग्निशामनदल दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी प्रविणकुमार मोहरे यांना झाडारून खाली उतरवलं. त्यानंतर आता त्यांच्या अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात येत आहे.