मुंबई: ‘पिया का घर’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘प्रेम रतन धन पायो’ सारख्या चित्रपटांचे निर्माते आणि राजश्री प्रॉडक्शनचे अध्यक्ष राजकुमार बडजात्या यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना गिरगावातील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊं डेशन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा दिग्दर्शक सूरज बडजात्या असा परिवार आहे.राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांच्यानंतर राजकुमार बडजात्या यांनी संस्थेचा कारभार हाती घेतला. १९६० ते १९८० या काळात त्यांनी सहनिर्माता म्हणून चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Story img Loader