लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एकाचवेळी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी या दरम्यानच्या काळात चित्रपटगृहे रिकामी राहू नयेत यासाठी जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा पर्याय चित्रपट व्यावसायिकांसाठी चांगलाच पथ्यावर पडला आहे. गेल्या आठवड्यात करण जोहर दिग्दर्शित ‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या पुन: प्रदर्शनानंतर या आठवड्यात सलमान – शाहरुख जोडीचा ‘करण अर्जुन’ आणि त्यापुढच्या आठवड्यात डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बीवी नं. १’ हे दोन चित्रपट नव्याने प्रदर्शित होणार आहेत.

akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

नोव्हेंबरमध्ये ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हिंदीत ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुलभुलैय्या ३’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अपेक्षेप्रमाणे या दोन्ही चित्रपटांनी दिवाळी आणि त्यानंतरच्या आठवड्यांत अडीचशे कोटींपार कमाई करत चित्रपट व्यावसायिकांना सुखद धक्का दिला. या दोन चित्रपटांमुळे नोव्हेंबर महिन्यात मोठ्या कलाकारांच्या नवीन चित्रपटांनी प्रदर्शनाची तयारी दाखवलेली नाही. १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला ‘कंगुवा’ हा दाक्षिणात्य चित्रपट आणि २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘मेट्रो इन दिनों’ हा अनुराग बसू दिग्दर्शित सिक्वेलपट वगळता कोणताही मोठा चित्रपट नसल्याने मधल्या काळात पुन्हा एकदा जुने चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटगृह व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे करण जोहर दिग्दर्शित ‘कल हो ना हो’ हा २१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट १५ नोव्हेंबरला पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आठवड्याभरात १.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आणखी वाचा-मुंबई : निवडणूक कर्तव्यावर असताना पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

या शुक्रवारी राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या जानेवारीत या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत राकेश रोशन यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘करण अर्जुन’ पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी राकेश रोशन कमालीचे उत्सूक आहेत. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असला तरी प्रेक्षकांच्या एका संपूर्ण पिढीसाठी हा चित्रपट नवीन आहे. पुन्हा प्रदर्शित करण्याआधी मी चित्रपटाची दृश्यात्मकता आणि ध्वनी आरेखनाची गुणवत्ता अद्ययावत करून घेतली आहे. त्यामुळे नव्या प्रेक्षकांचा या चित्रपटाला प्रतिसाद कसा आहे, याची मला उत्सूकता आहे. आत्तापर्यंत चित्रपटाच्या तिकिटांसाठी २० ते ३० टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे, असे राकेश रोशन यांनी म्हटले आहे.

पुढच्या आठवड्यात २९ नोव्हेंबरला डेव्हिड धवन दिग्दर्शित १९९९ साली प्रदर्शित झालेला ‘बीबी नं. १’ हा लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. डेव्हिड धवन यांनीही विनोदी चित्रपट प्रेक्षकांना नेहमी आवडतात, त्यामुळे ‘बीवी नं. १’लाही पुन्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय, ५ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचा ‘पुष्पा : द राईज’ हा पहिला चित्रपटही या शुक्रवारी, २२ नोव्हेंबरला पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे.

आणखी वाचा-उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचाराचा शीण घालवून लागले आकडेवारीच्या अभ्यासाला

पुन:प्रदर्शनाचे नियोजन

जुन्या चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन करण्याची सुरुवात पीव्हीआर-आयनॉक्स चित्रपटगृह समूहाने केली. ‘काही जुने, गाजलेले चित्रपट पाहण्यासाठी एक पिढी आवर्जून चित्रपटगृहात येते. तर प्रेक्षकांच्या नव्या पिढीलाही शाहरुख खान, सलमान खान अशा मोठ्या कलाकारांचे जुने चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याचा अनुभव मिळतो. पुन्हा प्रदर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून चित्रपटांनी आर्थिक कमाईही केली असल्याने आम्ही जुने, दर्जेदार हिंदी चित्रपट सातत्याने पुन्हा प्रदर्शित करण्याचे धोरणच ठरवले आहे’, अशी माहिती पीव्हीआर-आयनॉक्स समूहाच्या निहारिका बिजली यांनी दिली.