म्हाडाच्या मुंबई मंडळाने वांद्रे पश्चिम येथे पशुवैद्यकीय रुग्णालय, तसेच ओशिवरा येथे स्त्री रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रुग्णालयांच्या बांधकामासाठी मंडळाने काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता या भूखंडांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. अखेर मंडळाने भूखंडांच्या ई-लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ई-लिलाव करून हे भूखंड ३० वर्षांसाठी भाडेतत्तावर देण्यात येणार आहेत. ई-लिलावात बाजी मारणारी संस्था, कंपनीला रुग्णालयाची बांधणी करून ते कार्यान्वित करावे लागणार आहे.
हेही वाचा >>>भारत-पाकिस्तान सामना अन् गोव्यातील सामना; चार्ल्स शोभराजला पकडणाऱ्या मधुकर झेंडेंचा आठवणींना उजाळा
मुंबई मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई पशुवैद्यकीय आणि स्त्री रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालयासाठी मंडळाने ओशिवरा येथील ८,८९० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड निवडला होता. तर पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी वांद्रे पश्चिम येथील ११२५ चौ मीटर क्षेत्रफळाची जागा शोधली. या जागा निश्चित केल्यानंतर मंडळाने येथे रुग्णालय उभारण्यासाठी मे महिन्यात स्वारस्य निविदा जारी केल्या. या निविदेनुसार वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, रुग्णालयाची निविदा रद्द झाल्या आणि हे दोन्ही प्रकल्प बारगळले. मात्र या दोन्ही रुग्णालयांची गरज असल्याने मंडळाने अखेर या जागांचा ई-लिलाव करून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या, रूग्णालये चालविणाऱ्या संस्था, कंपन्यांना भूखंड देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे वांद्रे येथील पशुवैद्यकीय रूग्णालयाच्या जागेच्या ई-लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा >>>न्यायालयाच्या आदेशामुळे शुक्ला यांची पंचाईत?
दरम्यान, लवकरच ओशिवरा येथील रुग्णालयाच्या जागेच्या ई-लिलावासाठीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उभारणी करणाऱ्या इच्छुक संस्थांकडून/कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदेत बाजी मारणाऱ्या संस्था/कंपनीकडून प्रीमियम घेऊन भाडेतत्त्वावर भूखंड देण्यात येणार होता. मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे मंडळाला अखेर या निविदा रद्द कराव्या लागल्या.