‘म्हाडा’च्या मुंबईतील १,२४४ घरांसाठी आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर आता सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम झाली असून १,२४४ घरांसाठी ८७,६४७ अर्जदार रिंगणात आहेत. ‘म्हाडा’ने यंदा मुंबई मंडळातील १,२४४ घरांसाठी अर्ज मागवले होते. त्यासाठी ९३,५५९ अर्ज आले. ५,९६१ अर्जामध्ये पॅनकार्ड, बँक तपशील आदी काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते बाद करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले होते. पण त्यांना दाद मागण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम करण्यात आली. त्यानुसार एकूण ५,९१२ अर्ज बाद करण्यात आल्याने ८७,६४७ अर्जदार ‘म्हाडा’च्या सोडतीसाठी स्पर्धेत उरले आहेत. शुक्रवारी रंगशारदा सभागृहात स. १० ते सायं. ५ या वेळेत दोन सत्रांमध्ये ही सोडत होईल.