last phase of samruddhi highway : मुंबई : नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. हे काम सप्टेंबरअखेरीस पूर्ण करून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एम एस आर डी सी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेवटच्या टप्प्याच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर – भिंवडी अंतर केवळ आठ तासांत पार करता येणार आहे.

नागपूर – मुंबई अंतर आठ तासांत पार करता यावे यासाठी नागपूर – मुंबई असा एकूण ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग एमएसआरडीसी बांधत आहे. या महामार्गातील ६२५ किमी लांबीचा महामार्ग अर्थात नागपूर – इगतपुरीपर्यंतचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. सध्या इगतपुरी – अमाणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या टप्प्याचे काम एमएसआरडीसी करीत आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर – भिवंडी थेट प्रवास आठ तासांत करता येणार आहे. त्यामुळे हा टप्पा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. अतिवेगवान प्रवासाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या शेवटच्या टप्प्यातील ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत अवघड होता. पण हे काम वेगाने अंतिम टप्प्यात आणण्यात आले आहे. तर उर्वरित काम सप्टेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर तात्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा…मुंबई : बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यास आलेल्या व्यक्तीला अटक

आचासंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल व्हावा यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार असला तरी या टप्प्यातील कसारा येथील पुलाची एकच बाजू खुली होणार नाही. या बाजूचे बऱ्यापैकी काम पूर्ण होणे शिल्लक आहे. ही बाजू डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याकरिता डिसेंबरपर्यंत थांबता येणार नाही. त्यामुळे पुलाची जी बाजू सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहे, त्या एका बाजूवरून दुहेरी वाहतूक सुरू करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आहे. तसे नियोजनही पूर्ण झाले आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून नागपूर ते आमणे, भिवंडी प्रवास अतिवेगवान होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे इगतपुरी – आमणे अंतर पार करण्यासाठी आजघडीला किमान अडीच तास लागतात. पण हा टप्पा कार्यान्वित झाल्यास हे अंतर अंदाजे ४० मिनिटात पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.