मेसेजिंगच्या दुनियेत तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवणा-या व्हॉट्स अॅपवर अखेर आपलाचा तिरंगा ध्वज फडकला आहे. भारतीय यूझर्सना व्हॉट्स अॅपकडून वर्षाअखेर मिळालेली ही भेटच आहे. व्हॉट्स अॅपवर तिरंग्यासोबत आणखी २२ झेंड्याचा समावेश करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून भारतीय यूजर्सची भारताच्या झेंड्याचा व्हॉट्स अॅपमध्ये सामावेश करुन घ्या अशी जोरदार मागणी चालू होती. अनेकांनी तर यासाठी व्हॉट्स अॅपच्या कंपनीला मेलही केले होते. अखेर या सर्वांना यश आले आणि तिरंगा व्हॉट्स अॅपवर फडकला. यूजर्सना तिरंगा आपल्या व्हॉट्स अॅपमध्ये घ्यायचा असल्यास त्यांना आपले व्हॉट्स अॅप अपडेट करावे लागणार आहे. नव्याने केलेल्या अपडेटमुळे आता व्हॉट्स अॅपवरील झेंड्यांची संख्या ३३ झाली आहे.
व्हॅट्स अॅपवरील नव्याने समाविष्ट करण्यात आलेले देशांचे झेंडे
भारत, ब्राझिल, मॅक्सिको, युएई, दक्षिण आफ्रीका, अर्जेंटिना, इराण, ब्रिटन, मोनॅको, नायझेरीया, व्हेनेझुएला, कोलंबिया, नेदरलॅण्ड, इजिप्त, स्वित्झर्लंण्ड, सिंगापूर, इस्रायल, कॅनडा, थायलण्ड, आयर्लंण्ड, हॉगकॉंग, चिली, सौदी अरेबिया