मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यातून गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजारांहून अधिक गंभीर रुग्णांना वाचविण्याचा विक्रम केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कक्षाचे काम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २९२ कोटींपेक्षा अधिक तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नागपूर कार्यालयमधून २८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. याबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त रुग्णालये या योजनेत जोडण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडरपदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या १३ दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधी योजने’ला गती देण्याचे आदेश जारी केले होते. तसेच यापूर्वी अनेक खर्चिक व गंभीर आजारांचा या योजनेत समावेश नव्हता, तो आता नव्याने करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जात आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे २०१४ ते मार्च २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून लक्षावधी रुग्णांना मदत करण्यात आली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मदत करण्यात आली होती. परिणामी पाच वर्षांत काही लाख रुग्णांना आर्थिक मदत मिळू शकली. यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली तर ४७४ धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास १२०० कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा या गरीब रुग्णांना मोफत उपचारासाठी तर दहा टक्के खाटा या दुर्बल घटकातील लोकांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचारासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालयात किती गरीब रुग्णांना उपचार केले जातात याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षच्या माध्यमातून याचे नियोजन व नियंत्रण करण्यास सुरुवात केली. यासाठी या कक्षेत स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला होता. यामुळे कोणत्या धर्मादाय रुग्णालयात किती खाटा या योजनेत उपलब्ध आहे व किती लोकांना मदत मिळते याची रोजची माहिती उपलब्ध होऊ लागली. परिणामी राज्यातील ४७४ धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून लाखो गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना फडणवीस यांनी वैद्यकीय मदत मिळवून दिली होती. यात कॉक्लिअर इंप्लांट व लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया प्राधान्याने करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. या शिवाय अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. वरील निकषात कोणते रुग्ण बसू शकतात व त्यांना नेमकी किती मदत दिली जावी हे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली असून ती याबाबत निर्णय घेते असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयात येण्याची गरज राहिलेली नाही. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करून मदत मिळण्यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास त्यांच्या मोबाईलवर अर्ज उपलब्ध करून दिला जातो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश करण्यात आल्यामुळे अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनीग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.