मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असले तरी मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे

हेही वाचा >>>शिरपूर तालुक्यात संशयिताकडून मशिनगनसह २० गावठी बंदुका, काडतुसे जप्त; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

मलिक आणि सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मलिक यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्याआधी, एका मूत्रपिंडावरही सामन्य जीवन जगता येते. लोक दोनपैकी एक मूत्रपिंड दान करून एका मूत्रपिंडावरही सामान्य आयुष्य जगतात. तसेच ताण सगळ्यांनाच असतो. त्यामुळे या दोन कारणास्तव वैद्यकीय जामीन दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद ईडीने मलिक यांच्या याचिकेला विरोध करताना केला होता.

दुसरीकडे, एक मूत्रपिंड निकामी झाले असून दुसरे ६० टक्केच कार्यरत असल्याचा दावा मलिक यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच याच कारणास्तव आपल्या स्थितीचा सहानुभूतीपूर्व विचार करावा आणि या प्रकरणाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून आपल्याला वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची मागणी मलिक यांच्यातर्फे करण्यात आली होती. मलिक यांच्या मूत्रपिंडाच्या स्थितीचा अहवालही युक्तिवादाच्या वेळी सादर करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर मलिक यांची प्रकृती मागील आठ महिन्यांपासून खालावली आहे. त्यांना आधीच मधूमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा आणि यकृताच्या व्याधींनी ग्रासले आहे. आठ महिन्यात त्यांचे १६ किलो वजन कमी झाले असून मूत्रपिंडाच्या आजारामुळेच त्यांनी आई-वडील आणि भावाला गमावल्याचा दावाही मलिक यांनी वैद्यकीय जामिनाची मागणी करताना केला होता.

हेही वाचा >>>नाशिक: कर्मचाऱ्यांकडून मालकाला अडीच कोटींचा गंडा, सात जणांविरुध्द गुन्हा

त्यावर, मलिक यांच्यातर्फे सादर केलेला अहवाल वैद्यकीय जामिनासाठी पुरेसा नसल्याचा दावाही ईडीने केला होता. शिवाय, आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ जेजे रुग्णालयातील तज्ज्ञांचा अहवाल न्यायालयात सादर केला. मलिक यांच्यावर त्यांनीच सुचविलेल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची आवश्यकता नाही, असा दावाही ईडीतर्फे करण्यात आला होता.

Story img Loader