ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस पुलाखाली नव्याने सुरू झालेल्या तिकीट कार्यालयाजवळ प्रवाशांच्या गर्दीचे छायाचित्र घेणारे नवभारत दैनिकाचे छायाचित्रकार विजय दुर्गे यांना शनिवारी संध्याकाळी तेथील फेरीवाल्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.
याप्रकरणी दुर्गे यांनी केलेल्या तक्रारीवरून कृष्णा शहा (२४), इम्रान अन्सारी (२८), अजय मंडल (२१) आणि अरविंद हरिजन यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. ठाणे स्थानक परिसरास सध्या पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. याप्रकरणी प्रशासन फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.

Story img Loader