तब्बल १४ वर्षांनंतर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागाचे प्राध्यापक डॉ. अभय कुलकर्णी यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे निवड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्राध्यापक पदासाठी २००१ मध्ये डॉ. अभय कुलकर्णी यांनी आपल्या हस्ताक्षारातील अर्जासह अन्य कागदपत्रे सादर केली होती. मात्र, या कागदपत्रांची खातरजमा न करताच निवड समिती तसेच संबंधित अधिकारी यांनी त्यांची निवड केली. दरम्यान, डॉ. कुलकर्णी यांच्या कागदपत्रांची नुकतीच पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉ. कुलकर्णी यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यांनी अर्जामध्येही खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ. संजय बर्नवाल यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून डॉ. कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा