कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कृतिका शर्मानं लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी विक्की सिदनावर भा.द.वि. ३५४, ५०९ आणि ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
‘मीटू’ मोहिमेत आरोप झाल्यानंतर ‘राधा क्यों गोरी, मैं क्यों काला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्कीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. जॉन अब्राहम, निखिल अडवाणी आणि भूषण कुमार यांनी देखील ‘बाटला हाऊस’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या क्रेडिट लाइनमधून विक्कीला दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai: FIR registered against casting director, Vicky Sidana in Versova police station last evening, under sections 354,509 and 406. He has been accused of sexual misconduct by actor Kritika Sharma
— ANI (@ANI) November 21, 2018
काय आहे प्रकरण –
गेल्या महिन्यात एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृतीकाने विक्कीवर लैगिंग शोषणाचे आरोप केले होते. २०१३ मध्ये एका ऑडिशनदरम्यान आपल्याबरोबर झालेली आपबीती तिने सांगितले होते. ‘ऑडिशनसाठी मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी मला विक्की सिदानाच्या कार्यालयाची मदत घ्यावी लागली. मुंबईला पोहोचल्यावर विक्कीने मला पाहताच प्रश्न केला. मी तुझी मदत केली तर तू मला काय देशील, त्यानंतर एका मीटींगच्या बहाण्याने एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेला आणि एका फ्लॅटमध्ये पोहोचताच दरवाजा बंद करून मला त्याने अचानक धक्का देत बेडवर पाडले आणि माझ्यासोबत बळजबरी करू लागला. मी तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आले, असे काय काय मी त्याला ओरडून ओरडून सांगितले. शेवटच्या क्षणाला त्याला काय वाटेल माहित नाही, पण तो थांबला आणि ऑटो कर अन् निघ, तुझी फ्लाईट आहे, असे तो मला म्हणाला. यानंतर मी तडक ऑटो पकडून एअरपोर्टकडे निघाले,’ असे कृतिकाने सांगितले होते.