मनसेचे आमदार राम कदम यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
घाटकोपर येथे सुधीर मोरे कदम यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सध्या मोरे मतदारसंघात सभा घेत असून कदम यांच्यावर टीका करत आहेत. मंगळवारी रात्री भीमनगर येथे सभा सुरू असताना कदम यांनी आपल्याशी अनोळखी मोबाइलवरून संपर्क साधला आणि ही टीका भारी पडेल, असे सांगून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोरे यांनी केला. यापूर्वीही कदम यांनी धमकी दिल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. मंगळवारी रात्री उशीरा घाटकोपर पोलिसांनी कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला.

Story img Loader