वांद्रे येथील नर्गीस दत्त झोपडपट्टीत लागलेल्या आगीत ३५ झोपडय़ा जळून खाक झाल्या. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. परंतु ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला.
ही आग विझवण्यासाठी आगीचे चार बंब, चार  टँकर आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Story img Loader