मुंबईतल्या माटुंगा भागात असलेल्या बिग बाजारला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मागील काही वेळापासून आग लागली आहे. या परिसरात धुराचं साम्राज्य आहे. मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान या ठिकाणी दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका मराठी वाहिनीनेही या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माटुंगा येथील तुळशी पाईप मार्गावर असलेल्या बिग बाजारला ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याने परिसरात धुराचे लोटही दिसत आहेत. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचेही कारण समजू शकलेले नाही.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at big bazar in matunga area mumbai