आज (बुधवार) सकाळी नरिमन पॉंईंट परिसरातील जमनालाल बजाज मार्गावरील मित्तल टॉवरच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  

Story img Loader