पावणे एमआयडीसीतील सोनी कंपनीला रविवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या कंपनीत सीडी आणि डीव्हीडी तयार केल्या जात होत्या. त्यामुळे कंपनीला लागलेली आग मोठय़ा प्रमाणात पसरत गेली. डीव्हीडी, सीडी आणि कागदी खोक्यांमुळे आगीने भीषण रूप धारण केले. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुटी असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते. ठाणे, उरण, पनवेल, कल्याण-डोंबिवली येथून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले होते. दरम्यान, आगीमागचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader