मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा मंगळदास मार्केटला काही वेळापूर्वी आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी का लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मंगळदास मार्केटमधून धुराचे लोट येऊ लागले. काही काळ भीतीचंही वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

Story img Loader