दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात एका बहुमजली इमारतीला आज (गुरूवार) आग लागली.
आगीची माहिती मिळताच जवळपास १२ अग्नीबंब आणि नऊ पाण्याचे टॅंकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. होली फॅमिली हायस्कूलच्या जवळ असलेल्या कॉग्रेसच्या इमारतीतून निघणा-या आगीच्या ज्वाळा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बृहनमुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.
रूग्णवाहिनीसुध्दा घटनास्थळी पोहोचली असली तरी अद्याप कोणताही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. 

Story img Loader