Mumbai Fire News: आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तीनही घटनांमध्ये अद्याप जखमी किंवा कुणाला हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा पोलीस ठाण्याच्या जवळ स्तर – १ ची आग लागली होती. एका रेशन दुकानात आग लागल्यानंतर इलेक्ट्रिक वायरिंगमुळे आग पसरली. ज्यामध्ये दुकानातील कागदपत्र, फर्निचर आणि इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दल, पोलीस आणि बेस्टच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व येथील महाकाली रोड, एमआयडीसीमधील भंगारवाडीतील दुकानांना भीषण आग लागली. या दुर्घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आले. दहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीच्या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हे वाचा >> पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात १४ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या

गोरेगाव येथील हब मॉलजवळील लोढा फियोरेन्जा इमारतीला आगल लागल्याची घटना घडली. सायंकाळी ७.३५ दरम्यान आग लागल्याची माहिती मिळत आहे. इमारतीच्या ३० व्या मजल्यावर स्तर -१ ची आग लागली होती. अग्निशमन दलासह मुंबई पोलीस आणि अदाणी पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. याही घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

मुंबईतील कामाठीपुरात दिवाळीच्या फटाक्यामुळे आग लागल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आगीची माहिती दिली. कामाठीपुरातील गल्ली क्र. १२ च्या मैदानामागील कारखान्यात आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.