मुंबईमधील भिवंडीमध्ये भीषण आगीत ११ प्लास्टिक गिफ्टची गोदामे जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडीतील गुंदवली परिसरातील कृष्णा कॉम्पलेक्समधील ११ प्लास्टिक गिफ्टची गोदामे जळून खाक झाली आहेत. ज्या भागात आग लागली तिथे मोठ्याप्रमाणात गोदाम आहेत.. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३ ते ४ तास लागतील अशी माहिती मिळाली आहे.

 ही आग सुरू असताना मुंबईत आणखी एका ठिकाणी आग लाागली आहे. कांदिवलीमधील दामूनगर येथील चाळीतही आग लागली आहे. दामूनगर चाळीत असलेल्या कपड्याच्या गोदामाला आग लागली आहे. ही आग किती मोठी आहे हे अद्याप समजू शकले नाहीत. प्राथमिक माहितीनुसार, अग्निशामन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळावर पोहचल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

 या वर्षाभरात मुंबईत आगीमध्ये बऱ्याच लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईमधील कामगार रूग्णालयाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. ही आग लागल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आग लागली आहे. दोन्ही घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader