मुंबईतील लोअर परळमधील किमजी नामजी चाळीत मंगळवारी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

लोअर परळमधील किमजी नामजी चाळीत मंगळवारी अचानक आग लागली. आगीच्या धूराचे लोट सर्वत्र पसरले होते. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निमशन दलाच्या ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. सुमारे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन राबवले जात आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची स्थानिकांमध्ये होती. मात्र अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी अद्याप या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आगीमुळे परिसरात काही काळासाठी गोंधळाचे वातावरण होते.