लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वरळीतील पूनम चेंबरमध्ये रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. सात मजली व्यवसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.

वरळीतील ऍनि बेझन्ट मार्गावर ऍट्रिया मॉलच्या समोर असलेल्या पूनम चेंबरमध्ये रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली होती. पूनम चेंबर ही सात मजली व्यावसायिक इमारत असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका गाळ्यात ही आग लागली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम हाती घेतले.

आणखी वाचा-आणखी एक बेस्ट बसचा अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अग्निशमन दलाने ही आग दोन क्रमांकाची असल्याचे जाहीर केले आहे. काचेची तावदाने असलेली ही इमारत असून ज्या मजल्यावर आग लागली आहे तेथील तावदानामधून धूर बाहेर पडत होता.

Story img Loader