मुंबई : गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिरानजीकच्या फिल्मसिटी मार्गावरील रत्नागिरी हॉटेलजवळील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे, गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, अदानी आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारीही दुर्घटनास्थळी दाखल झाले. दुकानांना लागलेली आग सातत्याने वाढू लागल्याने आसपासच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी पळ काढला. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे ७ वाजून ८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. तसेच, ७ वाजून १५ मिनिटांनी आगीला क्रमांक दोनची वर्दी देण्यात आली आहे. काहीच क्षणात आगी दुकानातील आग आसपासच्या झोपड्या, गाळे आणि गोदामांमध्ये पसरली.

धुरामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागला. या आगीत विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, दुकानातील सामान, लाकडी वस्तू जळून खाक झाल्या. अखेर रात्री नऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.