मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या स्पोर्ट कॉम्पेक्स परिसरातील डी एन नगरात भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांमार्फत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेतील जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.