मुंबईतील ग्रँट रोड येथील एका बहुमजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागली होती. ही इमारत २२ मजली असून अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर लागलेली आग अटोक्यात आली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटना वाढल्या आहेत. आज सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती रोड येथील धवलगिरी या इमारतीला भीषण आग लागली. ही आग लेव्हल २ ची असल्याचं वृत्त आहे. आगीचे धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते.
२१ आणि २२ व्या मजल्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांना टेरेसवर सुरक्षितपणे हलवण्यात यश आलं आहे. तर, १५ व्या मजल्यावरही ७ ते ८ नागरिक अडकले होते. त्यांनाही पायऱ्यांमार्फत टेरेसवर हलवण्यात आलं आहे. दरम्यान, ११.१० मिनिटांनी ही आग अटोक्यात आली. या आगीत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.