मुंबईच्या अंधेरीमध्ये एका इमारतीला आग लागल्याचं वृत्त आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या रवान्या झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या यारी रोड परिसरातील मझील मस्जिद चौकातील सरिता इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला त्यानंतर आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती जखमी झाला असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broken out after a cylinder blast sarita building at mazil masjid chowk in andheris yari road