गोखले रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला आग लागल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. बँक बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या एटीएममधील पैसे जळून खाक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गोखले रोड हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. भगवान हॉटेलजवळ असलेल्या एका इमारतीच्या तळ मजल्यावर पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा शॉटसर्किटमुळे या एटीएममध्ये आग लागली.काही क्षणांतच ही आग तळ मजल्यावर पसरली. यामुळे घाबरलेल्या स्थानिक रहिवाशांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले.
पैसे जळून खाक ?
यानंतर अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यावेळी बँकेत कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र या एटीएममध्ये असलेले पैसे जळून खाक झाले असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात ‘एटीम’ केंद्राला आग
गोखले रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला आग लागल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. बँक बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या एटीएममधील पैसे जळून खाक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
First published on: 13-04-2013 at 03:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in atm centre of thane