लालबागमधील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली आहे. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीनंतर इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आलं होतं. याआधीही ऑक्टोबल २०२१ मध्ये ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये आग लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीमध्ये आग लागली. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर धुराचे लोट पसरले uals. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.

One Avighna Park Fire Video: जीव वाचवण्यासाठी गॅलरीला लटकला, पण हात सुटला अन् प्राण गमावला

ऑक्टोबर २०२१ मध्येही लागली होती आग

गतवर्षीही अविघ्न इमारत आग लागल्यामुळे चर्चेत आली होती. १९ व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या आगीत इमारतीच्या सुरक्षारक्षाकाने जीव गमावला होता. या आगीनंतर टोलेजंग इमारतींमधील सुरक्षा यंत्रणेसंबंधी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वर्षभरानंतर पुन्हा त्याच इमारतीत आग लागली असल्याने त्यावेळी दिलेली आश्वासन आणि सुरक्षेचे नियम अद्यापही जैसे थेच आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.