गुलमोहर इमारतीच्या परिसरात आणि रस्त्यावर वाहने उभी असल्यामुळे या अरुंद रस्त्यावरून अग्निशमन दलाच्या ब्रॉन्टो या वाहनास घटनास्थळी पोहोचण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. तसेच इमारतीची अग्निशमन यंत्रणा बंद असल्यामुळे घटनास्थळापर्यंत पर्यायी यंत्रणा उभी करावी लागली. त्यामध्येच अग्निशमन दलाच्या जवानांचा अध्र्याहून अधिक वेळ वाया गेला, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे येथील समतानगर भागात रविवारी पहाटे सुंदरवन पार्कमधील गुलमोहर या इमारतीच्या १० व्या मजल्यावर भीषण आग लागली. यात एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर इमारतीच्या सज्जाचा आधार घेतल्याने मायलेक बचावले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुमारे अडीच तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
शिवाजीराव चौगुले (८४) आणि निर्मला चौगुले (७८) अशी मृतांची नावे आहेत, तर रंजना सावे (५०) आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सावे हे दोघे बचावले आहेत. समतानगर भागातील गुलमोहर या इमारतीच्या १० व्या मजल्यावर रंजना आपल्या कुटुंबासोबत राहतात. येथेच त्यांचे आई-वडील म्हणजेच चौगुले दाम्पत्यही राहत होते. रविवारी पहाटे त्यांच्या घराला अचानक आग लागली आणि चौगुले दाम्पत्याला बेडरूममधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला, तर रंजना आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य हे दोघे बचावासाठी गॅलरीच्या सज्जावर जाऊन उभे राहिले. मात्र त्यांची सुटका करण्यासाठी तब्बल दीड तासांचा अवधी लागला. या घटनेत ते दोघेही जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी दोन ब्रॉन्टो गाडय़ा, पाच अग्निशमन यंत्र वाहन, चार टँकर तैनात करण्यात आले होते. घरामध्ये लाकडी फर्निचर मोठय़ा प्रमाणात होते. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.