गोरेगांव चित्रनगरीत आज (बुधवार) सकाळी गेट नं. १ जवळ आग लागली. हा सेट ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही आग लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे ४ बंब, ४ जेट्टी आणि एक रूग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कुठलाही जीवितहानी झाली नसली तरी सेटचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in filmcity on the sets of comedy nights with kapil