मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ लोकमान्य टिळक मार्गावरील एका हॉटेलला शुक्रवारी सायंकाळी आग लागून लाखो रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली.
मुंबई पोलीस मुख्यालयाजवळच्या युसुफ इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘अरेबियन ब्लू स्टार हॉटेल’च्या किचनमधील विद्युत प्रवाहामध्ये बिघाड झाल्यामुळे सायंकाळी सव्वापाच वाजता अचानक आग लागली. हॉटेलमधील लाकडी फर्निचर तसेच अन्य वस्तूंमुळे ही आग आणखी भडकली. सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र सायंकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ सीएसटीकडे वळविण्यात आली होती.

Story img Loader