चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील आयकर भवनाच्या सहाव्या मजल्यास गुरुवारी रात्री उशीरा आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी महत्वाची काही कागदपत्रे जळाल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader