ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर भीषण आग लागली होती.  या आगीत दोघाजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच, इमारतीत काहीजण अडकल्याचे वृत्त आहे. शिवाजीराव चौघुले (८४ वर्ष), निर्मला चौघुले (७८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
पहाटे लागलेल्या भीषण आगीवर ४ अग्निशामन दलाच्या गाड्यांनी नियंत्रण मिळविले आहे. या इमारतीतून दोघांना वाचविण्यात आले असून, त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग ऐवढी भीषण होते की अग्निशमन दलाचे ४ बंब सुमारे दीड तास आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते.

Story img Loader