‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त गिरगाव चौपाटीवर गेल्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमाच्या रंगमंचाला लागलेल्या आगीचा अहवाल येत्या बुधवारी पालिका आयुक्तांकडे सादर होण्याची शक्यता आहे. चौकशीची व्याप्ती वाढल्यामुळे याबाबतचा अहवाल अद्याप सादर होऊ शकलेला नाही.
प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. . हा अहवाल दोन दिवसांमध्ये सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती.
‘महाराष्ट्र रजनी’च्या रंगमंचाला लागलेल्या आगीच्या चौकशीची व्याप्ती वाढत आहे. या प्रकरणी अनेकांशी चर्चा करण्यात येत आहे. चौकशीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या बुधवापर्यंत अहवाल सादर होईल, अशी अपेक्षा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Story img Loader