हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी जालंधर येथून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दिलीप उपाध्याय आणि तलविंदरसिंग अशी त्यांची नावे आहेत. किल्ला न्यायालयात त्यांना गुरुवारी हजर करण्यात आले होते. हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर ३ ऑक्टोबर रोजी वर्सोवा येथे गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. तुरुंगात असलेला छोटा राजनचा हस्तक सतीश कालिया याने या हल्ल्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader