चार हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर गोळी झाडल्याची घटना बदलापूर पूर्व येथील गांधी चौकात मंगळवारी दुपारी घडली़ हल्ल्यात जखमी झालेल्या राऊत यांना डोंबिवलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर हल्लेखोर गाडी सोडून पळाले असून बदलापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बदलापूरात सलग दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बदलापूर येथील कुळगाव परिसरात योगेश राऊत राहत असून त्यांचा भाऊ जयेश मंगळवारी सकाळी गांधी चौकातून जात असताना हॉटेलमध्ये बसलेल्या चौघांनी पूर्व वैमनस्यातून त्याच्याशी वाद घातला़ जयेशने योगेश यांना घटनास्थळी बोलावून घेतले. योगेश यांनी घटनास्थळी पोहोचून भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर गोळी झाडून चौघे पळून गेले. उजव्या बरगडीत गोळी लागल्याने योगेश जखमी झाले आहेत.
बदलापूर शहर बंद
योगेश राऊत यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दुपारनंतर बदलापूर शहर बंद होते. बाजारपेठ, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing on ncp leader in badlapur