तळोजा कारागृहात डॉन अबू सालेमवर भरत नेपाळी गॅंगच्या देवेंद्र जगताप याने गोळीबार केल्याने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण जगताप याने यापुर्वीही सालेमवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती आता समोर आली .
  मुंबई स्फोट तसेच अनेक हत्यांच्या प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्यावर गुरूवारी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात  गोळीबार करून हल्ला करण्यात आला. मात्र २०११ सालीच सालेमवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. देवेंद्रने त्यासाठी तीन जणांना तयार केले होते त्यात एक देवेंद्रचा नातेवाईक रमाकांत कुलकर्णी हा देखील होता. सत्र न्यायालयात सालेम आल्यावर त्याच्यावर कसा हल्ला करायचा याची रंगीत तालिम सुद्धा झाली होती. परंतु गुन्हे शाखेला त्याची कुणकुण लागली आणि सत्र न्यायालयाच्या आवारातच या तिघांना अटक केली होती. त्यावेळी जर गुन्हे शाखेने हा डाव उधळला नसता तर चित्र वेगळे असते असे पोलीस सुत्रांनी सांगितले. तो हल्ला फसल्यानंतर देवेंद्र पुन्हा संधीच्या शोधात होताच आणि त्याने तळोजा कारागृहात हल्ला केला.
माझा संबंध नाही-मुस्तफा डोसा
अबू सालेमवरील हल्ल्यात माझा संबंध नसल्याने दाऊद टोळीचा गुंड मुस्तफा डोसा याने सांगितले. शनिवारी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आला असता त्याने ही माहिती दिली.
संतोष शेट्टी आणि माझी भेट झाली होती हे जरी खरे असले तरी या हल्ल्यात माझा संबंध नसल्याचे त्याने सांगितले. पुन्हा पोर्तुगालला परत जाण्यासाठी सालेमनेच हा स्टंट केल्याचा दावाही मुस्तफा डोसाने केला.

Story img Loader