लंडनच्या धर्तीवर देशातील पहिली विद्युत (इलेक्ट्रिक) दुमजली वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आली असून, सोमवारी ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईच्या रस्त्यांवर ही बस धावेल. या पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसमुळे बेस्टचा तोटा कमी होणार आहे. या बसचा खर्च प्रतिकिमी ५६ रुपये आहे आणि ७५ रुपये उत्पन्न आहे. त्यामुळे १९ रुपयांचा निव्वळ नफा बेस्टच्या तिजोरीत जमा होणार आहे. मार्चपर्यंत आणखी २० विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल होतील. त्यामुळे बेस्टचा संचित तोटा कमी होत जाण्याचा दावा बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आला आहे.

जानेवारी २०२२ मध्ये विद्युत दुमजली वातानुकूलित बस खरेदी करत असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या दुमजली वातानुकूलित बसचे लोकार्पण करण्यात आले. सलग सहा महिने अनेक तांत्रिक बाबी, चाचण्या पूर्ण करून सोमवारी बेस्टच्या ताफ्यात ही बस समाविष्ट करण्यात आली. या बसचा मार्ग कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे (पू) किंवा कुर्ला ते सांताक्रूझ असा असेल. या बसचे भाडे प्रति ५ किमीसाठी ६ रुपये असेल.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

हेही वाचा – Malad Fire: मुंबईच्या मालाड येथील झोपडपट्टीत अग्नीतांडव; जवळपास ५० झोपड्या जळून खाक, एकाचा दुर्दैवी मृत्यू

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, लंडनच्या धर्तीवर ही बस सुरू केली आहे. या बसमुळे आरामदायी आणि स्वस्तात प्रवास होणार आहे. डिजिटल तिकीट, पॅनिक बटणची सुविधा या बसमध्ये देण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा म्हणाले.


  • डिझेल बससाठी प्रतिकिमी १५० रुपये खर्च येतो.
  • सीएनजी बससाठी प्रतिकिमी १३० ते १४० रुपये खर्च येतो.
  • विदुयत बससाठी प्रतिकिमी ५६ रुपये खर्च येतो.

बसमध्ये एकूण ६५ आसने असून पहिल्या मजल्यावर ३० आणि दुसऱ्या मजल्यावर ३५ आसने देण्यात आली आहेत. पहिल्या मजल्यावर उभे राहून देखील प्रवास करता येणार आहे. मात्र, दुसऱ्या मजल्यावर उंच माणसांना प्रवास करताना डोके सांभाळून उभे राहावे लागेल. अन्यथा दुसऱ्या मजल्यावरून प्रवाशांना उभे राहता येणार नाही. तसेच, सध्याच्या विनावातानुकूलित दुमजली बसची आसन क्षमता ७८ असून या बसमधूनही उभ्याने दहा प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे विद्युत वातानुकूलित दुमजली बसमधील आसन क्षमता कमी आहे. डिझेलवर धावणाऱ्या दुमजली बसमध्ये एकच जिना होता. मात्र, विद्युत वातानुकूलित दुमजली बसमध्ये दोन जिने आणि दोन दरवाजे आहेत.

हेही वाचा – मुंबई : शून्य नोंदणी असलेल्या आणि अव्यवहार्य प्रकल्पाची नोंदणी रद्द करता येणार, महारेराचा निर्णय, विकासकांना दिलासा

प्रीमियम बस सेवा

बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो अ‍ॅपवर आधारित प्रीमियम बस सेवा सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ ते शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आता घरापासून ते कार्यालयापर्यंत प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे, मुंबईतील खासगी वाहनाची संख्या कमी होऊ शकेल. पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

खुली (ओपन डेक) दुमजली बस देखील वातानुकूलित होणार

सध्या ओपन डेक दुमजली बस सेवा सुरू आहे. मात्र, आता वातानुकूलित ओपन डेक बस तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच, मुंबईकरांच्या सेवेत ही बसदेखील दाखल होणार आहे. या बसचा पहिला मजला वातानुकूलित असेल, असे चंद्रा यांनी सांगितले.

हेही वाचा – घाटकोपरमधील माजी नगरसेवकाला अटक

या वर्षाअखेरपर्यंत ७ हजार नव्या बस

बेस्टकडे २०२६ सालापर्यंत १० हजार बसचा ताफा असेल. या सर्व विद्युत बस असणार आहेत. तर, पर्यावरणाच्यादृष्टीने बेस्टने पुढाकार घेतला आहे. डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी बेस्टद्वारे दोन लाख राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) मोफत वाटली जाणार आहेत.

Story img Loader