लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : अंधेरी पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पहिला तुळई (गर्डर) रेल्वे रुळावर स्थापन करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक दरम्यान हे काम पार पाडण्यात आले. त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य होणार आहे. संपूर्ण पूल पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी खुला होण्याची शक्यता आहे. अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आले.
या गर्डर स्थापनेवेळी आमदार अमित साटम, आमदार ऋतुजा लटके, मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, आणि सल्लागार मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या १५ दिवसात या पुलाची तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक कामे पूर्ण होतील असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे अभियंत्रिकी दृष्टया अत्यंत आव्हानात्मक काम होते. पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने सुचना दिल्याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्या तांत्रिक देखरेखीखाली हे काम प्रगतिपथावर आहे. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासूनच रेल्वे वाहतूक व पॉवर ब्लॉकच्या कालावधीत, रेल्वे परिसरात भूभागात दोनपैकी एक गर्डर मध्यरात्री रेल्वेहद्दीत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला.
हा महत्वाचा टप्पा पार पडल्याने उर्वरीत अंतरावर गर्डर स्थापनाही अल्पावधीत आणि सुलभतेने करता येणार आहे. येत्या पंधरवड्यात हा गर्डर १४ मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो ७.५ मीटर खाली आणणे ही कामे नियोजित आहेत.
येत्या काही दिवसात हा गर्डर उत्तर दिशेला सरकवून त्यानंतर टप्प्याटप्प्याने खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात येईल, नियोजित उंचीवर खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती महाले यांनी दिली.
आणखी वाचा-“वडापाव पाहिला की मला…”, राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर मसालेदार टीका
प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर म्हणजे, एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून गर्डर विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. रेल्वे भूभागातील एका गर्डरचे वजन अंदाजे १२०० मेट्रिक टन इतके आहे. तर लांबी ९० मीटर असून रूंदी १३.५ मीटर इतकी आहे.
- पुलाची लांबी- रेल्वे भूभागात- ९० मीटर
- रेल्वेबाहेर- पूर्वेस २१० मीटर, पश्चिमेस- १८५ मीटर
- पुलाची रुंदी- (रेल्वे भूभागात)- १३.५ मीटर
- रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)
- एकूण रुंदी- २४ मीटर