एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लीमन) या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन शनिवार आणि रविवारी (२५ व २६ फेब्रुवारीला) नवी मुंबईतील महापे व मुंबईत होणार आहे. राज्यात पक्ष अधिक संघटित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंब्रा, मालवणी या मुस्लीम बहुल भागात सभा व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

एमआयएमची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय अधिवेशन कधीच पार पडले नव्हते. पक्षाचा सर्व राज्यांमध्ये विस्तार झाल्याने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. शनिवारी पक्षाचे अधिवेशन नवी मुंबईतील महापेमधील हॉटेल रमदामध्ये होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मुंब्रा येथे जाहीर सभा होईल. पहिल्या दिवशी पक्षाचे सर्व खासदार-आमदार, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चेंबूरमध्ये अधिवेशन पार पडले. त्या दिवशी पक्षाचे देशभरातील लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मालाड मालवणीमध्ये सभा होईल. एमआयएमला विविध राज्यांमध्ये पाठिंबा मिळत आहे. आगामी लोकसभा तसेच विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची वाढ करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतील, असे जलील यांनी सांगितले.

How are the three Padma Awards different from each other
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री: तिन्ही पद्म पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Lucknow Pact
UPSC-MPSC : काँग्रेसचे लखनौ अधिवेशन का ऐतिहासिक ठरले? लखनौ करार नेमका काय होता?
maharashtra geography
UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील मृदा आणि तिचे प्रकार
कुतूहल : बहुआयामी गणिती भास्कराचार्य
विज्ञान म्हणजे काय?
non cooperation movement
UPSC-MPSC : असहकार चळवळ; कारणे, स्वरूप अन् महत्त्व
maharashtra geography, Konkan Coast,
UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकण किनारपट्टी
Story img Loader