मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे पादचारी पूल बांधला जाणार असून या पुलाला जिने, सरकते जिने आणि प्रथमच उद्वाहनाची सोयही असणार आहे. या पुलासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पादचारी पूल तयार झाल्यामुळे किमान पंचवीस हजार पादचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे एक पादचारी पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाला सरकत्या जिन्यांबरोबरच उदवाहनाची सोयही देण्यात येणार आहे. त्याकरीता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील हा या प्रकारचा पहिलाच पूल असेल. यापूर्वी मुंबईत किंग्ज सर्कल येथे पालिकेने पहिला सरकता जिना असलेला पूल तयार केला होता. त्यानंतर आता बहुतांशी पादचारी पुलांना सरकते जिने बसवण्यात येणार आहे. मात्र उदवाहनाची सोय असलेला हा पहिला पूल कांदिवलीत तयार होणार आहे. या पुलासाठी पालिकेने न्यू लिंक रोड आणि वाडीलाल गोसालिया रोड या परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी या रस्त्याचा रोज किती पादचारी वापर करताता त्याचा आढावा घेण्यात आला होता. त्यात या मार्गाने सरासरी किमान २७ हजार पादचारी रस्ता ओलांडून जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या पुलाची आवश्यकता असल्याचे मत भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. यादव यांनी या पुलाची मागणी गेल्यावर्षी केली होती. त्यानुसार आता हा पूल बांधण्यात येणार आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये पुन्हा संगीत मैफली

या पुलाच्या व उदवाहनाच्या देखभालीची पाच वर्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. पूल बांधणे आणि देखभाल या कामासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील दोन वर्षांत हा पूल बांधून तयार होणार आहे.

हेही वाचा – मुंबईतील तापमान वाढणार

रहिवासी, विद्यार्थ्यांना फायदा होणार

आठ शाळांमधील आठ ते नऊ हजार मुले रोज रस्ता ओलांडून जात असतात. पूल झाल्यास लालजी पाडा, गणेश नगर, इंदिरा नगर, संजय नगर, जनता कॉलनी, अभिषेक नगर येथील रहिवाशांना फायदा होणार आहे.