शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर जामीन मिळाला. यानंतर त्यांच्या कुटुंबासह समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना न्यायालयाच्या निर्णयाविषयी आणि राऊतांच्या तुरुंगातून सुटकेबाबत विचारले असता त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांनी ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचं सांगितलं. तसेच जामिनानंतर ठाकरे कुटुंबाकडूनही फोन आल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या बुधवारी (१० नोव्हेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षा राऊत म्हणाल्या, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला सर्वांनाच आनंद झालाय. संजय राऊत यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झालाय. ते कधी येतात याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

“आम्हाला ठाकरे कुटुंबाकडून फोन आला होता”

“आम्हाला ठाकरे कुटुंबाकडून फोन आला होता. खूप लोकांचे फोन आले. काही लोकांचे फोन आम्हाला उचलताही आले नाहीत. सर्वांनी संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं,” अशी माहिती वर्षा राऊत यांनी दिली.

हेही वाचा : “संजय राऊतांना विनाकारण अटक”, न्यायालयाने टोचले ईडीचे कान; वाचा काय म्हटलंय आदेशात!

“कुटुंबाला किती त्रास झाला हे न बोललेलंच बरं, कारण…”

“कुटुंबाला किती त्रास झाला हे न बोललेलंच बरं. कारण ज्याची व्यक्ती तुरुंगात असते त्यालाच ते दुःख कळतं. सत्याचा विजय झाला आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First reaction of sanjay raut wife varsha raut after bail from jail rno news pbs